पुणे, दि. 23 – जमीन, सदनिका अथवा दुकाने यांच्या खरेदी-विक्री व्यवहारातील गैरप्रकारला आळा घालण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने “ई सर्च’ ही संगणक प्रणाली विकसित केली आहे. आधी 2002 या वर्षांपासूनचे उपलब्ध होते. आता या प्रणालीमध्ये 1985 सालापासूनचे दस्त उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावर मागील 37 वर्षांपासून दस्त उपलब्ध झाले आहे. यामुळे नागरिकांना आता जुने दस्त शोधण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तसेच संबंधित मालमत्तेचा मालक कोण आहे, हे समजण्यास मदत होत आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पद्धतीने देण्यात अग्रेसर आहे. याचाच एक भाग म्हणून खरेदी-विक्री व्यवहाराचे जुने दस्त ऑनलाइन पाहण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक्र विभागाच्या ुुु.ळसी.ारहरीरीहीींर.र्सीें.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. “ई सर्च’मध्ये 1985 ते आजपर्यंतचे दस्त उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या दस्त पाहता येतात. “ई सर्च’ या सुविधेचा वापर करून शोधलेल्या दस्ताची अथवा दस्तांच्या सूचीची (इंडेक्स) प्रत डाऊनलोडही येते. एकाच जागेची किंवा सदनिकांची विक्री अनेकांना विकण्याचे प्रकार उघडकीस आले आहे.
यामध्ये खरेदीदाराची आर्थिक फसवणूक होते. तसेच एक सदनिका अनेक बॅंकेत गहाण ठेवून त्याआधारे कर्ज घेतल्याचे प्रकारही घडतात. असे प्रकार टाळण्यासाठी नोंदणी विभागाने “ई सर्च’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मालमत्तेची मालकी समजणार
राज्यात सुमारे 500 पेक्षा अधिक दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. यामध्ये दररोज सुमारे आठ ते नऊ हजार दस्तांची नोंदणी होते. एकाच जागेची किंवा सदनिकांची विक्री अनेकांना विकण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळे संबधित मालमत्तेची मालकी कोणाकडे आहे, याची माहिती खरेदीदाराला समजावी, यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरत आहे.