Google Drive – तुम्ही देखील Google खातेधारक असाल आणि Google Drive वर तुमचे फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप घेत असाल तर सावध व्हा. कारण गुगल ड्राइव्हमध्ये एक समस्या आली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांचा डेटा आपोआप डिलीट होत आहे. अनेक युजर्सनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. गुगलनेही हे मान्य केले आहे की, काही बगमुळे हे घडत असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
गुगलने एका निवेदनात म्हटले आहे की, काही युजर्सचा ड्राइव्ह डेटा डिलीट करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ही समस्या मुख्यतः Google ड्राइव्हच्या डेस्कटॉप वापरकर्त्यांसोबत झाली आहे. गुगलने म्हटले आहे की लवकरच एक नवीन अपडेट जारी करण्यात येईल.
ही समस्या टाळण्याचा मार्ग काय आहे?
Google Drive डेटाचा बॅकअप तुमच्या सिस्टीमवर घ्या. जरी काही कारणास्तव ड्राइव्हमधून डेटा हटवला गेला तरी, तुमचा डेटा तुमच्या संगणकावर सुरक्षित राहील.