अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ रॅकेटची चौकशी एनसीबी अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकातर्फे सुरु झालेल्या तपासात सारा अली खान, अर्जुन रामपाल, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दिया मिर्झा, अबिगल पांडे, भारती सिंह यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली. यापैकी एक नाव रकुल प्रित सिंह हिचं देखील होतं. परंतु अखेर तिच्याविरोधात कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे एनसीबीनं तिला निर्दोष मुक्त केलं.
View this post on Instagram
या दरम्यान एनसीबीने रकुल प्रीत सिंहला समन्स बजावला होता. मात्र, सुरुवातीला तिने समन्स मिळालाच नसल्याचा बहाणा देत टाळाटाळ केली होती. यामुळे या काळात तिला सोशल मीडियावर चांगलचं ट्रोल करण्यात आले होते. याबाबत पहिल्यांदाच डॅशिंग गर्ल रकुलने आपली प्रतिक्रिया दिली आहे .
View this post on Instagram
एक चॅट शोमध्ये तिने हजेरी लावली होती. यावेळी तिच्याविरोधात झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं. ती म्हणाली, “मी ट्रोलर्सला फार महत्व देत नाही. मी केवळ स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवते व अफवांकडे दुर्लक्ष करते. कारणशिवाय उगाचच कोणावर टीका करण्यासाठी माझ्याकडे ट्रोलर्सप्रमाणे रिकामा वेळ नाही. मात्र ज्यांना अजूनही वाटतं मी ड्रग्ज घेते त्यांनी पुरावे गोळा करुन सिद्ध करावं अन् पोलिसांकडे माझी तक्रार करावी.” असं म्हणत तिने ट्रोल करणाऱ्यांना ओपन चैलेंज दिल आहे.