अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष्य सध्या मुंबईच्या दिशेने लागलेले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जण मुंबईत होणाऱ्या शिंदे आणि ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात ( Dasara Melava ) होणाऱ्या भाषणांची मुद्दे ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. मागील बऱ्याच दिवसापासून दोन्ही गटांमध्ये एकमेकांवर प्रचंड टीका टिप्पण्या झाल्या आहेत. मात्र आज कोण काय बोलणार याबाबत सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा ( Dasara Melava ) शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावर होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसीच्या मैदानावर भरणार आहे. दरम्यान मेळाव्याला काही वेळ शिल्लक असताना मुख्यमंत्री शिंदेंनी एक मोठं ट्विट केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना “मराठी अस्मितेसाठी, मराठी बाण्याचं तेज राखण्यासाठी, हिंदुत्वाचा अमुल्य ठेवा जपण्यासाठी… आपण भेटतोय बीकेसी मैदानावर. दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा,” असे ट्विट केले आहे.
मराठी अस्मितेसाठी, मराठी बाण्याचं तेज राखण्यासाठी, हिंदुत्वाचा अमुल्य ठेवा जपण्यासाठी…
आपण भेटतोय बीकेसी मैदानावर. दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा….#चला_BKC pic.twitter.com/MFbjStzoQ0
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 5, 2022
यासोबतच त्यांनी त्यांच्या दसरा मेळाव्याबाबत ( Dasara Melava ) एक टिझर स्वरूपाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विविध कला संस्कृतींनाही दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ काही मिनिटातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सध्या सर्वांचं लक्ष्य हे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे लागले आहे. ( dasara melava 2022 eknath shinde share new tweet on Shivasena and Hinduism )