सोमाटणे, (वार्ताहर) – अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वांच्या लाडक्या गणरायाला भाविकांनी जल्लोषात तितक्याच भावपूर्ण अंतःकरणाने निरोप दिला. मावळ तालुक्यातील दारुंब्रे गावातील ग्रामस्थांनी महाराष्ट्राची संस्कृती जपत वारकरी परंपरेचे दर्शन घडवित लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ असा घोष करत गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात गणपतीची विसर्जन मिरवणूक काढली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. दारुंब्रे पांडुरंग भजनी मंडळ,
महिला भजनी मंडळ, शाळा चौक मित्र मंडळ यासह आळंदी येथील लहान मुलांच्या भजनी मंडळांतर्फे भजने, भक्तिगीते गात आणि मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली होती. अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने दारुंब्रे गावकऱ्यांनी बाप्पाला निरोप दिला.
विसर्जन मिरवणूकीला रामदास वाघोले, सार्थक वाघोळे, लक्ष्मण शितोळे, गणेश सु. वाघोले, गणेश या. वाघोले, काळूराम वाघोले, ईश्वर वाघोले, शरद भालेकर, संदीप वि. सोरटे यांसह ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले.
तसेच, मयूर वाघोले, अनिल वाघोले, सुरेश वाघोले, काशिनाथ भोंडवे, यादव सोरटे, सागर महाराज सोरटे, सुर्यकांत सोरटे, बाळासाहेब कदम, चंद्रकांत सोरटे, सुरेश वाघोले, उमेश द. आगळे आदीजण यावेळी उपस्थित होते.