शिरूर: येथे आकाशात दुर्मिळ इंद्रवज्र दिसत असून याचे अनेकांनी दर्शन घेतले आहे. हा एक अत्यंत दुर्मिळ भौगोलिक योग असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षानंतर आता योग आल्याची चर्चा ही नागरिकांमध्ये आहे.
आज सकाळी पासून हा इंद्रवज्र दिसत असून पूर्ण सप्तरंगी वर्तुळाने सूर्याला वेढले आहे. याबाबत नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे हे दुर्मीळ इंद्रवज्र म्हणजे काय हे नागरिकांना माहिती नाही. परंतु आता आकाशात नागरिकांनी या दुर्मिळ इंद्रवज्राला पाहून पहिल्या वेळेस पाहिले असल्याचे म्हटले आहे.