नगरकरांनी माणूसकीचे दर्शन घडविले 

नगर  – महाराष्ट्राची संस्कृती महान आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली येथे महापुराने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. माणुसकीच्या नात्याने नगर येथील आर्किटेक्‍टस्‌ इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असो.च्या वतीने नगरकरांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. नगरकरांनी मोठ्या संख्येने मदत केली.

नगरकरांनी खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडविण्याचे काम केले आहे. असोसिएशनने नेहमीच सामाजिक भावनेतून मदत करण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन असो.चे अध्यक्ष सलीम शेख यांनी केले आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली येथे झालेल्या पुरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदतीसाठी आर्किटेक्‍ट इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असो.च्या वतीने स्टॉल उभारण्यात आला होता. अध्यक्ष सलीम शेख, आदिनाथ दहिफळे, अशोक सातकर, अभिजित देवी, शोएब खान, एकनाथ जोशी, प्रदीप तांदळे, भुषण पांडव, सुरेंद्र धर्माधिकारी, विशारद पेठकर, आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here