दिल्ली : टी -20 क्रिकेटमध्ये अनेक नवनवे विक्रम होत असतात. यात काही विक्रम मोडले जातात तर काही विक्रम असे असतात जे मोडता येणे सहज शक्य नसते. मात्र आज एका खेळाडूने अशक्य वाटणारा विक्रम मोडत एक नवा विक्रम स्थापन केला आहे. डेरियस विसर या फलंदाजाने एका षटकात 39 धावा केल्या आहेत. तसेच त्याने डेरियसने एका षटकात 6 षटकार मारत युवराज सिंग, किरन पोलार्ड यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
🚨WORLD RECORD CREATED IN MEN’S T20 LEVEL 1 OVER 39 RUNS
Darius Visser scored 39 runs in match between Samoa Vs Vanuatu
(🎥 – ICC)#T20 #T20WorldCup #records #ICC #CricketUpdate #cricketnews pic.twitter.com/sXiyrlxjtE— SportsOnX (@SportzOnX) August 20, 2024
समोआ क्रिकेट संघ आणि वानुअतु क्रिकेट संघ यांच्यात हा सामना झाला होता. समोआ क्रिकेट संघाच्या डेरियस विसर या फलंदाजाने वानुअतु क्रिकेट संघाच्या नलिन निपिकोची धुलाई करत एका षटकात 39 धावा केल्या. समोआ क्रिकेट संघ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वानुअतु विरुद्ध खेळताना 10 धावांनी जिंकला.
या सामन्यात वानुअतुचा गोलंदाज नलिन निपिकोच्या नावावर एका नकोश्या विक्रमाची नोंद झाली. त्यानं एका षटकात तब्बल 39धावा दिल्या. तो कोणत्याही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला. याआधी सर्वाधिक 36 धावा देण्याचा विक्रम होता.
एका षटकात 6 षटकार मरणाऱ्यांमध्ये डेरियस विसरचा समावेश
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार मरणाऱ्यांमध्ये डेरियस विसरचा समावेश झाला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे.या अगोदर भारताचा युवराज सिंग, वेस्ट इंडिजचा केरॉन पोलार्ड आणि नेपाळच्या दीपेंद्र सिंह ऐरीने ही कामगिरी केली आहे.