रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड; परिसरात भीतीचे वातावरण

महाड : मुसळधार पावसामुळे पूराने थैमान घातलेल्या रायगड जिल्ह्यात दुर्घटना काही थांबण्याचे नाव घेत नाही. महाड जवळील तळीये गावात दरड कोसळून  अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून अद्यापही काहीजण बेपत्ता आहेत. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक दरड कोसळण्याची घटना समोर आली आहे. हिरकणी गावाजवळ घडलेल्या या दुर्घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

महाड तालुक्याला दरडींचा मोठा धोका जाणवत असताना रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाजवळ सकाळच्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळून झालेली ही दुर्घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून परिस्थिती किती भीषण आहे याचा अंदाज आपल्याला वर्तवता येऊ शकतो.

दरड कोसळण्याच्या या घटनेमुळे हिरकणी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने महाडमधील पूरग्रस्त भागातील पाणी आता ओसरले आहे. मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आणखी दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अद्यापही चिंता कायम आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.