दापोडी प्रकरण : ठेकेदाराची होणार चौकशी

दापोडीतील ड्रेनेज लाईन खड्ड्यात अडकून कामगाराचे मृत्यूप्रकरण


जिल्हाधिकारी यांनी कामासंदर्भात निर्माण केले प्रश्‍नचिन्ह


पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून माहिती मागविली

पुणे – दापोडी परिसरात ड्रेनेज लाइनचे काम सुरू असताना खड्ड्यात अडकलेल्या कर्मचाऱ्याला वाचविण्याच्या अथक प्रयत्नात अग्निशमन दलातील जवानाचा आणि एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या कामासंदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ठेकेदाराची चौकशी करून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला तत्काळ माहिती मागविली आहे. माहिती प्राप्त होताच संबंधित मृत व्यक्‍तींच्या नातेवाईकांना प्रशासकीय मदत मिळण्यासंदर्भातील अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या हद्दीतील दापोडी परिसरात अमृत योजनेंतर्गत ड्रेनेजची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या पाइपलाइनसाठी तीस फूट खोल, पाच फूट रुंद असा तीस फूट लांब खड्डा खणण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी संबंधित काम करत असताना एक कर्मचारी खड्ड्यात अडकल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. बचावकार्य सुरू असताना पुन्हा मातीचा भराव खचल्याने अग्निशमन दलातील जवान आणि कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले.

रात्री उशिरापर्यंतच्या अथक प्रयत्नानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन जवानांसह चार कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. परंतु, संबंधित कामगार नागेश जमादार आणि अग्निशमन दलाचे जवान विशाल जाधव यांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.