“दानिश कनेरिया पैशांसाठी काहीही करु शकतो”

पाकचे माजी क्रिकेटपटू जावेद मियॉंदादची कनेरियावर टीका

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशासह परदेशातही चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. देशात एकीकडे या कायद्याला विरोध होत असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्येही या कायद्यावरून वाद निर्माण झाला आहे. आपण हिंदू असल्याने संघात आपल्याला चुकीची वागणूक मिळत असल्याचा खुलासा पाकचा क्रिकेटर दानिश कनेरिया याने केला होता. त्यावरून पाकमध्ये वाद निर्माण झाला आहे. तर या वादात पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियॉंदादने यांनी उडी घेतली आहे.

दानिश कनेरियावर टीका केली आहे. दानिश हा पैशांसाठी काहीही करु शकतो आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे लोकं त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत, असेही मियॉंदाद यांनी म्हटले आहे. त्यांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे हेच समजत नाही. पण कनेरियाबद्दल विचारत असाल तर तो पैशांसाठी काहीही करु शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे लोकंही अशा व्यक्तीवर विश्वास ठेवत आहेत, ज्याच्यावर फिक्‍सींगमुळे बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये कनेरियाला आता कसलंही महत्व उरलेलं नाही.

क्रिकेटमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या खेळाडूवर तुम्ही विश्वास कसा ठेवता?? देशाची मान कोणामुळे खाली गेली?? सालच्या सुरुवातीच्या काळात मी पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक होतो, मला एकदाही असं जाणवलं नाही की दानिश हिंदु असल्यामुळे त्याला त्रास दिला जातोय.

शोएब अख्तरने एका चॅट शोमध्ये बोलताना दानिश कनेरिया हिंदू असल्याने इतर पाकिस्तानी खेळाडू त्याला योग्य वागणूक देत नव्हते असा खुलासा केला होता. यानंतर ज्यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली त्यांची नावं जाहीर करणार असल्याचं दानिशने जाहीर केलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.