“रंग दे बसंती’साठी डॅनिएलनेही दिली होती ऑडिशन

जेम्स बॉन्ड सिरीजमधील शेवटचा बॉन्ड डॅनिएल क्रेग याने “रंग दे बसंती”साठी ऑडिशन दिलेली होती. मात्र त्याचवेळी डॅनिएल क्रेगला जेम्स बॉन्डच्या रोलची ऑफर आली होती. 

त्यामुळे तो हा सिनेमा स्वीकारू शकला नव्हता, असे राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हटले आहे. “द स्टेंजर इन द मिरर” असे या आत्मचरित्राचे नाव आहे.

निर्माते डेव्हिड रिड आणि ऍडम बोविंग यांनी स्यू आणि जेम्स मॅकिनले यांच्या रोलसाठी ऍलिस पॅटन आणि स्टिव्हन मॅकिंटोश यांना निवडण्याचा आग्रह धरला होता.

जेम्स मॅकिनले याच्या रोलसाठी डॅनिएल क्रेगनेही ऑडिशन दिलेली होती. भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीच्या तख्तापर्यंत घेऊन जाणाऱ्या जेलरचा हा रोल होता. त्याची निवड जवळजवळ निश्‍चित झाली होती.

मात्र त्याचवेळी त्याला जेम्स बॉन्डचे काम करायचे होते, असे मेहरा यानी आपल्या पुस्तकात लिहीले आहे. “रंग दे बसंती”च्या पाठोपाठ डॅनिएल क्रेगचे “कॅसिनो रॉयल” हा बॉन्डपट रिलीज झाला होता. त्यानंतर डॅनिएल क्रेगला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.