धोकादायक सुरक्षा भिंत पाडली!

पिंपरी  –पिंपरी-चिंचवड महापालिकेने थेरगाव येथील पवना नदीकाठी असलेल्या केजुबाई उद्यानाची धोकादायक सुरक्षा भिंत पाडली आहे. भिंतीला तडे गेल्याने खबरदारी म्हणून भिंत पाडल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

थेरगाव येथील पवना नदी काठी महापालिकेचे केजुबाई उद्यान आहे. या उद्यानात नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत असतात. सकाळी, संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांसह तरुण-तरुणींची मोठी गर्दी उद्यानात असते. दरम्यान उद्यानातील सुरक्षा रक्षक भिंतीला तडे गेले होते.

मागच्या काही दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे ही धोकादायक भिंत पडण्याची भीती होती. त्यामुळे, महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडली आली आहे.

दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सीमाभिंत, सुरक्षा भिंत कोसळण्याच्या घटना घडू शकतात. केजुबाई उद्यानातील सुरक्षा भिंतीला तडे गेले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने भिंत पाडली आहे.

– संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्‍त. 

Leave A Reply

Your email address will not be published.