भाग्यश्रीच्या मुलाचे इंटरनेटवर खतरनाक फोटो

सलमान खानबरोबर “मैने प्यार किया’ मधून पदार्पण करणाऱ्या भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी देखील आता बॉलिवूडमध्ये हंगामा करायला लागला आहे. त्याने इंटरनेटवर आपले काही अफलातून फोटो अपलोड केले आहेत. त्याचे फोटो बघून टायगर श्रॉफ आणि विद्युत जमवालच्या बॉडी बिल्डिंगच्या फोटोंची आठवण होते आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhimanyu (@abhimanyud)


यापूर्वी अभिमन्यूने “मर्द को दर्द नहीं होता’च्या प्रमोशनच्यावेळीही असेच फोटो अपलोड केले होते. अभिमन्यूने आपले फोटो अपलोड करताना रणवीर सिंहला देखील टॅग केले आहे. अर्थातच रणवीरने त्याचे कौतुक केले आहे. रणवीरचे कौतुक खूप मोटिव्हेशनल असल्याचे अभिमन्यूने म्हटले आहे. अभिमन्यूच्या या कॉमेंटवर रणवीर भलताच खूष झाला आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhimanyu (@abhimanyud)

त्याने “खतम’ एवढीच एक कॉमेंट पोस्ट करून अभिमन्यूचे कौतुक केले आहे. अभिमन्यूच्या फोटोंवर इतरही अनेकजणांनी कॉमेंट केल्या आहेत. गुलशन देवय्याने त्याला चांगला आहार घेण्याची सूचनाही केली आहे. आता अभिमन्यू “निकम्मा’ आणि “आंख मिचौली”मध्येही दिसणार आहे. ऍक्‍टर म्हणून आपले करिअर सुरू करण्यापूर्वी अभिमन्यूने “दम मारो दम” आणि “नौटंकी साला”चे डायरेक्‍टर रोहन सिप्पींना असिस्टंट म्हणून काम केले आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.