हिमनग विलग झाल्याने पेंग्विनच्या वसाहतींना धोका

अटार्टिंका – अंटार्टिकावरील ए68ए हा मोठ्या आकाराचा हिमनग हा लार्सन सी या हिमसमूहातून वेगळा झाला असून त्यामुळे पेंग्विनच्या वसाहतींना मोठा धोका निर्माण झाला आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

हा हिमनगाच्या आकाराचे अनुमान बांधायचे तर इंग्लंडच्या नैऋत्येला असलेल्या सॉमरसेट देशाच्या आकाराचा हा ए68ए हिमनग आहे. या देशाचा आकार आहे 4171 चौरस किलोमीटर. आता एवढ्याच आकाराचा हिमनग लार्सन सी या हिमसमूहातून वेगळा झालेला आहे आणि तो दिशाहीनपणे फिरत आहे.

सध्या हा हिमनग दक्षिण अटलांटिक समुद्रात अर्जेंटनाच्या नजीक असलेल्या साऊथ जॉर्जिया आणि साऊथ सँडविच बेटांच्या दिशेने सरकत आहे. या हिमनगामुळे या बेटावर असलेल्या हजारोंच्या संख्येने असलेल्या पेंग्विनच्या वसाहतींना धोका निर्माण झालेला आहे.

या हिमनगामुळे पेंग्विनना मिळणाऱ्या अन्नपुरवठ्याच्या साखळीवर परिणाम झाला तर हजारो पेंग्विन भुकेने मरण पावण्याची शक्यता आहे. या हिमनगाचा सील माशांच्या घरट्यांवरही परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

हा हिमनग या बेटांवर आदळण्याच्या 50-50 टक्के शक्यता असल्याचे ब्रिटीश अंटार्टिक सर्व्हे (बीएएस) या संस्थेतील संशोधकांचे मत आहे. जर हा हिमनग आदळला तर त्यामुळे प्राण्यांचा समुद्रात जाण्याचा मार्ग बंद होईल तसेच त्याचा परिणाम समुद्रातील जीवांवर होईल.

हा हिमनग आदळला नाही तरी त्याच्यामुळे समुद्रातील नैसर्गिक अन्नसाखळीत अडथळे निर्माण होतील अशी चिन्हे आहेत. बीएएसमधील पर्यावरण तज्ज्ञ प्रा. गेरेन्ट टार्लिंग यांच्या मते, हिमनग आदळल्यानंतर इथले समुद्रीजीवन पूर्वपदावर येऊ शकते परंतु हा हिमनग इथेच अडकून पडला तर समुद्रीजीवन पूर्वपदावर येण्यासाठी दहा वर्षे लागतील.

जेव्हा तुम्ही पेंग्विन आणि सील यांच्याविषयी बोलत असता तेव्हा पेंग्विनचा अंडी घालण्याचा आणि प्रजननाचा काळही विचारात घ्यावा लागतो. या काळात पेंग्विनना अन्नाच्या शोधात समुद्रात लांबवर प्रवास करावा लागतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.