कोकण किनारपट्टीला क्‍यार चक्रीवादळाचा धोका

किनारपट्टीच्या परिसरात अतिवृष्टीचा इशारा

पुणे – अरबी समुद्रात तयार झालेल्या क्‍यार चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर घोघावत आहे.या चक्रीवादळामुळे येत्या चोवीस तासात कोकण,गोवा आणि कर्नाटकाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टीचा तर मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्रांत बुधवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते.या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर गुरुवारी क्‍यार या चक्रीवादळात झाले.हे वादळ सध्या रत्नागिरी पासून 360 किलोमीटर तर मुबंईपासून 450 किलोमीटर अंतराव आहे. या वादळाचा ताशी वेग हा 65 ते 70 किलोमीटर इतका आहे.रविवार पर्यत ही स्थिती राहणार आहे.त्यानंतर हे वादळ ओमन कडे सरकले जाण्याचे संकेत आहे.

या वादळामुळे कोकण,गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर ढगाची दाटी निर्माण झाली आहे.तसेच वादळी वारे सुद्धा वाहून लागले आहे.समुद्र ही खवळलेला असून उंच उच लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत.यामुळे मच्छिमारांना समुद्रात नजाण्याचा इशारा देण्यात आला आहे.या वातावरणाबदलामुळे कोकणात आगामी 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागरात ही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे.हे क्षेत्र ओडिसा किनारपट्टी लगत आहे.त्यामुळे या परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.