वरंधा घाट रस्ता वाहतुकीसाठी “डेंजर’

भोर – भोर – महाड मार्गावरील वरंधा घाटातील महत्त्वाच्या वाहतुकीच्या रस्त्यावर इंटरनेट-केबलच्या नावाखाली संबंधित कंपनीने निकृष्ट दर्जाचा साईडपट्टीचा भरावा केला असल्यामुळे रस्ता दीड ते दोन मीटर दरीच्या बाजूने खचला आहे.त्यामुळे वाहतूक धोकादायक बनली असून, वाहनचालकांनी वाहने सावधपणे चालवावीत, असा इशारा भोरच्या बांधकाम विभागाने दिला आहे.

महाड-पंढरपूर रस्त्यावर सोमवारी (दि. 1) दुपारच्या वेळी दमदार पावसाचा जोर कायम होता. इंटरनेटच्या केबल गाडण्यासाठी साईडपट्ट्यांवरील उकरलेल्या चारीत पाणी मुरून उंबरडे (ता. भोर) फाट्यानजीक रस्ता दोन मीटर दरीच्या बाजूला खचला आहे. मार्गावरील 30 किलोमीटर घाट रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. घाटात उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेने इंटरनेटवर्कची केबल टाकण्यासाठी चारी खोदली होती. ठेकेदाराने योग्य सपाटीकरण न केल्यामुळे पावसाचे पाणी यात मुरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.