मुंबई :राज्यात कोरोना विषाणूचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज मुंबईत एकाच दिवसात १०३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर , राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ७४८ वर पोहचला आहे. दरम्यान राज्यात मुंबईसह ११३ जण कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळते आहे.
राज्यात मुबंईत सर्वात जास्त कोरोनाबाधित असून आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. आज आलेल्या अहवालात १०३ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५५ अहवाल हे खासगी लॅबमधून आलेले आहेत. ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत घशाच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते.