तुरूंग अधिकारी पोखरणकरसह सहा आरोपींना दणका

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरण : हायकोर्टाने जामीन नाकारला

मुंबई – भायखळा महिला कारागृहात मारहाणीमुळे मृत्यू झालेल्या मंजुळा शेट्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तुरूंग अधिकारी मनिषा पोखरणकर यांच्यासह सहा महिला पोलीस अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. या सहाही जणांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.

मंजुळा शेट्ये हिला किरकोळ कारणावरून तुरुंगातील सहा महिला अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. त्यात तिचा कारागृहातच 24 जूनला मृत्यू झाला होता. या प्रकरणाची सुरूवातीला वाच्चता करण्यात आली नाही. परंतू कारागृहातील कैद्यांनी आवाज उठविल्यानंतर आणि उच्च न्यायालयाने फटकारल्याने या प्रकरणाची दखल घेतली गेली.

या प्रकरणी क्राईम ब्रॅचने तुरूंग अधिकारी मनिषा पोखरणकर यांच्यासह बिंदू नायकवडे, वसीमा शेख, शीतल शेगांवकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे यांच्या विरोधात सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.दरम्यान, सत्र न्यायालयाने या सहा जणांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्या समोर सुनावणी झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.