दैनिक “प्रभात’ व आर. जे. सायकल स्टुडिओच्या वतीने आयोजन
भिगवण रस्त्यावरील जयश्री गार्डन येथे आज सायंकाळी सहा वाजेपासून उत्साहाला उधाण
बारामती – नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात दैनिक “प्रभात’ व आर. जे. सायकल स्टुडिओ यांच्या वतीने “पंच तारांकित’ भव्य दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती शहरात प्रथमच लाईव्ह बॅंडवर दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे दैनिक प्रभात व आर.जे. सायकल स्टुडिओ यांनी आयोजित केलेल्या या उत्सवाला तरुणाईचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
शहरातील भिगवण रस्त्यावरील जयश्री गार्डन येथे रविवारी (दि. 6) सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत दांडिया उत्साहाचा सोहळा पार पडणार आहे. दांडिया उत्सवात बक्षिसांची देखील लयलूट होणार आहे. बेस्ट मेल-फिमेल कपल ग्रुप तसेच किड्स कॉस्ट्यूम अशा स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत. महिला तसेच कपल यांना दांडिया खेळण्याची स्वतंत्र सोय करण्यात आले आहे.
कार्यक्रमादरम्यान सरप्राईज गेस्ट येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. त्यामुळे सरप्राईज गेस्ट कोण असणार याची उत्सुकता देखील तरुणाईमध्ये शिगेला पोहोचली आहे. मान्यवरांची देखील मांदियाळी कार्यक्रमादरम्यान असणार आहे. दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विजेत्यांना दैनिक “प्रभात’ व आर. जे. सायकल स्टुडिओ यांच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात
येणार आहे.