दांडीबहाद्दर नगरसेवकांनो, खुलासा द्या; गैरहजर राहिलेल्या 27 जणांना भाजपची नोटीस

पुणे – प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या करवाढीवर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी महापालिकेची खास सभा झाली. यावेळी भाजपच्या तब्बल 27 नगरसेवकांनी दांडी मारली. यावर त्यांना आता पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. “सूचना देऊनही तुम्ही गैरहजर का राहिले,’ याचा खुलासा तातडीने करण्याच्या आशयाची ही नोटीस आहे.

सभागृह नेते गणेश बीडकर यांनी ही नोटीस बजावली आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन आठवड्यांपूर्वीच भाजपच्या सर्व नगरसेवकांना ठाणे येथे प्रशिक्षण देण्यात आले. त्यात “सर्व नगरसेवकांनी सभांना उपस्थित राहावे, नागरिकांच्या हितासाठी कसे प्रश्‍न उपस्थित करायचे, याचे मार्गदर्शन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केले होते. त्यानंतरही हा प्रकार घडल्याने पक्षाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

पालिकेची खास सभा तसेच पर्यावरणासंबंधीची तहकूब सभा 18 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली. याला उपस्थित राहण्यासाठी नगरसचिव कार्यालयाच्या वतीने टपालाद्वारे कार्यपत्रिका पाठवण्यात आली होती. तसेच सभागृह नेता कार्यालयामार्फत प्रत्येक सभासदाला फोन करून सभेला उपस्थित राहावे, याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, इतके करूनही काही सभासदांनी “दांडी’ मारली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.