सलमानला प्रभुदेवाकडून डान्सचे धडे

सलमानची ऍक्‍शन आणि डान्स म्हणजे “लय भारी’ असे त्याचे फॅन म्हणत असतात. त्याच्या डान्स स्टेप्स केवळ त्यालाच शोभून दिसतात. दुसऱ्या कोणी तसा प्रयत्न करण्याच्या भानगडीत पडूच नये. पण सल्लूमियांना देखील कोणाकडून तरी डान्स स्टेप्स शिकायला लागतात. स्वतः सलमाननेच इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमधून ही बाब मान्य केली आहे.

“दबंग 3′ चे शुटिंग सध्या जोरात सुरू आहे. प्रभुदेवाकडे या सिनेमाच्या डायरेक्‍शनची जबाबदारी आहे. प्रभुदेवा स्वतः उत्तम डान्सर आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचे “उर्वशी’ हे गाणे आणि त्यातील हॅट घालून केलेला डान्स सगळ्यांनाच आठवत असेल. याच डान्सच्या स्टेप्स प्रभुदेवाकडून शिकण्याचा प्रयत्न सलमान करतो आहे, असे इन्स्टाग्रामवरच्या व्हिडीओमध्ये दिसते आहे.

 

View this post on Instagram

 

Dance class from the master himself . . Prabhu Deva @kichchasudeepa @wardakhannadiadwala

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमानने प्रभुदेवाबरोबर काम करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2009 मध्ये सलमानच्या “वॉन्टेड’चे डायरेक्‍शनही प्रभुदेवाने केले होते. “दबंग’चे डायरेक्‍शन अभिनव कश्‍यपने आणि “दबंग 2’चे डायरेक्‍शन सलमानचा भाऊ अरबाझ खानने केले होते. आता प्रभुदेवाच्या डायरेक्‍शनखालील “दबंग 3′ येत्या डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.