पुणे स्थानकातून दानापूर एक्‍स्प्रेस रवाना

पुणे- लॉकडाऊननंतर देशात 100 ट्रेन्स धावणे सुरू झाले आहे. त्या अंतर्गत पुणे स्थानकातून पहिली रेल्वे दानापूरसाठी सोमवारी रवाना झाली. सायंकाळी 8.55 वाजता प्लॅटफॉर्म 1वरून निघालेल्या या गाडीत फक्‍त कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांना प्रवेश देण्यात आला.

याशिवाय या प्रवाशांचे स्क्रिनिंग देखील करण्यात आले. यातून 1,454 जणांनी प्रवेश केला. यावेळी प्रवाशांना स्वत:चे पाणी आणि अन्न आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. तर, ज्यांना उपलब्ध होणार नाही अशांसाठी रेल्वेने मोफत पाणी आणि अन्न पुरवठा केला. दरम्यान, दानापूर एक्‍स्प्रेसशिवाय दक्षिण आणि उत्तरेकडील राज्यांत जाणाऱ्या काही गाड्या पुण्यामार्गे धावल्या, या गाड्यांना पुणे स्थानकावर थांबा देण्यात आला, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.