नवी दिल्ली – मारूती सुझुकी कंपनीने भारतात विकलेल्या 40,453 कारमधील हेड लॅम्पमध्ये खराबी आढळून आली आहे. कंपनी या गाड्या विनामूल्य दुरुस्त करून देणार आहे.
4 नोव्हेंबर 2019 ते 25 फेब्रुवारी 2020 या काळात तयार झालेल्या कंपनीच्या इको कारमध्ये ही खराबी आढळून आली आहे. वितरक ग्राहकांना कळवून या गाड्या दुरुस्त करून देतील असे कंपनीने म्हटले आहे.
या संदर्भात देशातून कोणत्याही ग्राहकाने कसलीही तक्रार केली नव्हती. मात्र, ही खराबी कंपनीला आढळून आल्यानंतर कंपनीने स्वतःहून खराबी दुरुस्त करून देण्यास पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात आले.