राज्याच्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान

मुंबई – राज्यात काल बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाशीम जिल्ह्यातल्या मंगरूळ, कारंजा, मालेगाव, रिसोड मानोरा आणि वाशीम तालुक्‍यात काल रात्री वादळी -वारा,तसंच गारा पडल्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा या पिकासह फळबागा आणि भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातला वीज पुरवठा मध्यरात्री उशिरापर्यंत बंद होता.

वर्धा जिल्ह्यातल्या सिंदी, आर्वी आणि कारंजा तालुक्‍यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे चणा, गहू पपई, संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी करून ठेवलेला गहू, चणाही पावसामुळे भिजला.

बुलढाणा जिल्हयातल्या बुलडाणा, खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, शेगाव, संग्रामपूर, शेगाव सह मोताळा सिंदखेड राजा या तालुक्‍यातल्या अनेक गावांमध्ये काल संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला.

परभणीत सोनपेठ तालुक्‍यातल्या उक्कडगाव ते वडगावच्या परिसरात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि गारांसह मुसळधार पाऊस झाला. तर गंगाखेड-परळी या रस्त्यावरच्या सोनपेठ हद्दीतल्या उक्कडगाव पासून, नैकोटवाडी, करम, ते गंगाखेड पासून दहा किलोमीटर अंतरावरील वडगावपर्यंत वादळी वारे, गारांचा पाऊस पाऊस सुरू होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.