चंदिगढ – दलित आणि कामगार कार्यकर्त्या नोदीप कौर यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. त्यांना खंडणी आणि हत्याच्या प्रयत्नांच्या आरोपावरून जानेवारी महिन्यांत अटक करण्यात आली होती. न्या, अवनिश झिंगम यांच्या न्यायालयात या जामीन अर्जावर सुनावणी झाली.
या याचिकेच्या अर्जासोबतच उच्च न्यायलयाला हरियाणा पोलिसांनी बेकायदा अटक केल्यासंदर्भात आलेल्या इ मेल्सची न्यायालयाने स्वत:हून (सु मोटो) दखल घेतली. कौर या सध्या कर्नाल कारागृहात आहेत. त्यांनी आपले वकील ऍड. आर. एस. चीमा आणि हरिंदरदीपसिंग बायन यांच्या मार्फत आपली बाजू मांडली. सोनिपतमधील कुंडली पोलिस ठाण्यात 12 जानेवारीला त्यांच्यावर नोंदवलेला गुन्हा अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने लादलेल्या नव्य तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात आपल्याला मोठा जनाधार मिळत असल्याने आपल्याला या खटल्यात चुकीच्या पध्दतीने गुंतवण्यात आले. पोलिस आणि न्यायलयीन कोठडीत असताना त्यांना शारीरिक मारहाण करण्यात आली. त्यांची शारीरिक तपासणी न करणे हा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलमन 54चे उल्लंघन आहे.
हरियाना पोलिसांनी कौर यांचे हे आरोप न्यायालयात फेटाळले. कौर यांनी ही बाब वैद्यकीय अधिकारी आणि न्यायदंडीादकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली नाही. या उलट पोलिसांनी अटक करण्यापुर्वी त्या पोलिसांवर हल्ले करण्यासाठी उद्युक्त करत होत्या, असे पोलिसांनी न्यायलयात सांगितले.
पोलिसांनी त्यांचा वैद्यकीय अहवाल सादर न केल्याने ही सुनावणी शुक्रवारपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय न्या. अवनीश झिंगण यांनी बुधवारी घेतला होता. आज निकाल देताना त्यांना जामीन मंजूर केला.