जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेने शनिवारी इंग्लंडविरूध्दच्या आगामी टी-२० क्रिकेट मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. या संघात वेगवान गोलंदाज ‘स्टेनगन’ डेल स्टेन हा या मालिकेव्दारे सुमारे ११ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.
#BreakingNews Quinton de Kock has been named captain of the Proteas T20 squad that will take on England in the three-match #KFCT20 international series from 12 to 16 Feb in East London, Durban & Centurion. #ProteasT20Squad #Thread pic.twitter.com/gVwD0wGDbY
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 8, 2020
स्टेनने मागील वर्षी मार्चमध्ये अखेरचा टी-२० सामना खेळला होता. संघाची कर्णधारपदाची धूरा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकाॅक याच्याकडे सोपविण्यात आली आहे.नियमित कर्णधार फाफ डुप्लेसिस सध्या संघाबाहेर आहे.
Proteas T20 squad:
Q de Kock, Reeza Hendricks, T Bavuma, R van der Dussen, D Miller, P van Biljon, D Pretorius, A Phehlukwayo, JJ Smuts, B Hendricks, T Shamsi, L Ngidi, S Magala, B Fortuin, D Steyn, H Klaasen. #ProteasT20Squad pic.twitter.com/qpZCjwVN6c— Proteas Men (@ProteasMenCSA) February 8, 2020
दक्षिण आफ्रिका-इंग्लंड दरम्यान तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेस १२ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार असून दुसरा व तिसरा सामना अनुक्रमे १४ व १६ फेब्रुवारी रोजी होईल.
आफ्रिका टी-२० संघ : क्विंटन डिकॉक (कर्णधार व यष्टीरक्षक), रीजा हेंड्रिक्स, तेंबा बवूमा, रासी वैन डरदुसें, डेविड मिलर, पीट वैन बिल्जोन, ड्वाइन प्रेटोरियस, एंडी फेहलुकवायो, जोन-जोन स्मूट्स, ब्यूरन हेंड्रिक्स, तबरेज शम्सी, लुंगी नगिडी, सिसंडा मगला, बिजोर्न फोर्टिन, डेल स्टेन, हेनरिक क्लासेन.