पुणे – मेहुण्याकडील पिस्तुल पाहून परत देत असताना चुकून ट्रीगर दाबून गोळीबार होऊन मेहुणा जखमी झाल्याप्रकरणात दाजीला सत्र न्यायाधीश एस.एम. आगरकर यांनी 15 हजार रूपयांचा जामीन मंजुर केला.
दादाभाऊ रामकिशन चव्हाण (टाकळी हाजी, ता. शिरूर) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. भालचंद्र पवार, ऍड. संकेत ठाणगे, ऍड. अक्षय रतनगिरी यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. संजय बाळू पवार (राळेगण थेरपाळ, ता.पारनेर, जि.नगर) याने फिर्याद दिली आहे. ही घटना 5 मार्च 2020 रोजी घडली.
मेहुणा फिर्यादी दाजीकडे गेला होता. त्यावेळी त्याच्याकडील पिस्तूल पाहताना दाजीकडून चुकून गोळी सुटली. ती फिर्यादीच्या दंडात घुसली. त्यावेळी दाजीकडे येत असताना नगर जिल्ह्यात अज्ञाताने गोळीबार केल्याचा बनाव त्यांनी केला. त्यामुळे सुरुवातीला पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो नंतर शिरूर पोलीस स्टेशनला ट्रान्स्फर झाला. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना चव्हाण याने ऍड. भालचंद्र पवार, ऍड. संकेत ठाणगे आणि ऍड. अक्षय रतनगिरी यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला तो पुराव्यांमध्ये ढवळाढवळ करायची नाही, तपासात सहकार्य करायचे, तपास अधिकारी बोलतील त्यावेळी पोलीस स्टेशनला हजर राहणे आणि आणि दुसरा यासारखा गुन्हा करायचा नाही या अटीवर न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.