पुणे – दैनिक प्रभातचे माजी कर्मचारी संजय नारायण जुन्नरकर यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन कन्या आणि एक मुलगा असा परिवार आहे.
“प्रभात’मध्ये त्यांनी जवळपास तीस वर्ष सेवा बजावली. मनमिळाऊ आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारे सहकारी असा त्यांचा लौकिक होता. शुध्द मराठी भाषेच्या वापराबाबत ते आग्रही असत.