वाघोली – वाघोली येथे दैनिक प्रभात दिपोत्सव 2021 च्या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधवराव, उद्योजक नटराज सातव पाटील, भाजप युवा मोर्चा हवेली तालुका अध्यक्ष अनिल भाऊ सातव पाटील, वाघोली शहर भाजप अध्यक्ष केतन जाधव, सरपंच दीपक गावडे, कविता जगताप, संदीप वारे, शुभम कुटे, सौरभ कुटे, विशाल कुटे, अविनाश कुटे, स्वप्नील कुटे, संदेश कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.