बुद्धिदेवतेच्या चरणी पुण्यनगरी लीन

पुणे : गणेश जयंतीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. गणेश जयंती निमित्त पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विविधरंगी फुलांनी सजवण्यात आलेल्या मंदिराला भेट देण्यासाठी तसेच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित झाले होते. रात्रीच्या वेळी मंदिराला केलेली सजावट आणखीनचं आकर्षक दिसत होती. भाविकांना यावेळी आपल्या स्मार्टफोन मध्ये मंदिराचे फोटो तसेच सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.

यावेळी गायिका लिटिल चॅम्प आर्य आंबेकर हिने आपली गायन सेवा सादर केली पाहटे चार ते सहा या वेळात तिने ही सेवा गणपती चरणी अर्पण केली यावेळी तिने विविध भक्तीगीत सादर केली यावेळी सुनील रासने, महेश सुर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, बाळासाहेब सातपुते, अक्षय गोडसे आदी उपस्थित होते.

त्याचबरोबर 101 सुवासिनींच्या हस्ते गणेश जन्म सोहळा पार पडला .अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात महिला गणेश भक्तांनी दुपारी 12 वाजता पाळणा हलवून दिमाखदारपणे हा गणेश जन्म सोहळा पार पडला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.