Pune Ganesh Visarjan 2024 | आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आज पुणेकर सज्ज झाले आहेत. गणपती विसर्जनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ढोल- ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. पुण्याचे आकर्षण ठरल्या जाणाऱ्या दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. लाडक्या गणरायाला वाजतगाजत आणि दिमाखदार मिरवणुकीने निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.
आकर्षक विद्युत रोषणाई असलेल्या श्री उमांगमलज रथामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान झाले आहेत. जटोली शिवमंदिराच्या विषयाप्रमाणे रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली भगवान शंकराची मूर्ती, त्याच्या बाजूला त्रिशूळ व डमरू आणि कळस म्हणून मोठा रुद्राक्ष आहे. Pune Ganesh Visarjan 2024 |
रथाच्या खांबांवर विशेष विद्युत रोषणाईचा वापर करण्यात आला आहे. एलईडी आणि पार लाईट्सने रथ उजळून निघणार आहे. गणेशोत्सवाच्या उत्सवाची रंगत वाढवणारी ही सजावट पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे. हे पाहण्यासाठी भाविकही उत्सुक असतात. Pune Ganesh Visarjan 2024 |
मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांची गजर, नगारे, ढोल ताशा पथक, सनई चौघडा हे वाद्यं विशेष आकर्षण असणार आहेत. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत रुग्णसेवा रथ अग्रभागी असणार आहे. याशिवाय प्रभात ब्रास बॅण्ड, दरबार ब्रास बॅण्ड, स्वरूपवर्धिनीचे ढोल-ताशा पथक, आणि इतर वाद्य पथके सहभागी झाले आहेत.