पुणे -श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या विशेष यागांचे आयोजन करण्यात येत आहे. मंगळवारी मंदिरात मृत्युंजय आणि धन्वंतरी महायाग पार पडला. यावेळी करोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना गणरायाचरणी करण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मंगळवारी वेदमूर्ती नटराज शास्त्री आणि ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम सुरू आहेत.
महागणपती पूजा, महासंकल्प, पुण्यवाचनम्, स्थलशुद्धी, कलशस्थापना, महा मृत्युंजय देवता, धन्वंतरी जप यासह होम-हवन करण्यात आले. आरतीने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
करोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी हे याग करण्यात येत आहेत. यांसह दुसऱ्या दिवशी उग्रनरसिंह व सुदर्शन महायाग होणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी घराबाहेर न पडता ऑनलाइन माध्यमातून दर्शन घेण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले.