‘दगडूशेठ’च्या दर्शनासाठी दि.30पर्यंत ;डिस्टंन्सिग’

पुणे – केंद्र सरकारच्या निर्णयानुसार देशातील काही मंदिरे 8 जूनपासून खुली करण्यात येणार आहेत. मात्र, राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणे आणि मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर 30 जूनपर्यंत बंदच राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.

राज्यातील करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यात अनेक सार्वजनिक ठिकाणे 30 जूनपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने देखील जून अखेरपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

परिस्थितीनुसार शासनाकडून पुढील नियमावली आल्यानंतर जुलै महिन्यात पुढील निर्णय ट्रस्टतर्फे घेण्यात येणार आहे. दि. 8 जून रोजी संकष्टी चतुर्थी असल्याने मंदिर खुले होणार, असा भाविकांचा समज होऊ नये, यासाठी दगडूशेठ मंदिर बंदच असून गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत असल्याचे ट्रस्टतर्फे कळविण्यात आले.

भाविकांनी या काळात श्रींचे ऑनलाइन दर्शन घ्यावे. यासाठी ट्रस्टचे संकेतस्थळ ुुु.वरसर्वीीहशींहसरपरिींळ.लो किंवा फेसबुक, ट्‌विटर, यू-ट्युब आणि ऍपद्वारे ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.