‘डॅडी’ होणार ‘ग्रँडफादर’; गवळी कुटूंबात हलणार लवकरच पाळणा

मुंबई –  ‘डॅडी’ अर्थात कुख्यात गॅंगस्टार अरुण गवळी हे आता आजोबा होणार आहेत. त्यांच्या मुलगी योगिता लवकरच गोंडस बाळाला जन्म देणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare)

फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये झळकलेला अक्षय वाघमारे याच्यासोबत योगिताचा विवाहसोहळा ८ मे रोजी पार पडला होता.

योगिता आणि अक्षय पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. यावेळी कुटुंबीयांनी दोघांना विवाहबंधनात अडकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला, असे अक्षय वाघमारेने मागे सांगितले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare)

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी अरुण गवळीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या अरुण गवळी नागपूर कारागृहात आहेत. येथील पाच जणांना करोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.