‘डॅडा, गले लगा ले…’ माही-झिवाचा इन्स्टाफोटो हिट

मुंबई  – कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या परिवाराविषयी नेहमी चर्चा होते. त्याची पत्नी साक्षी, धोनीची मुलगी झिवा यांच्याविषयी चाहत्यांना नेहमी आकर्षण राहिलेलं आहे. सध्या धोनी आयपीएलमध्ये प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करण्यात व्यस्त आहे.

अशातच धोनीची मुलगी झिवाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून बापासोबतचा एक हृदयाला भिडणारा फोटो पोस्ट केला गेला आहे. ज्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्‍स आणि कमेंट्‌सद्वारे बापलेकीला शुभेच्छा दिल्या आहेत.

माहीचं त्याच्या लेकीवर म्हणजेच झिवावर खूप प्रेम आहे. तो जरी मॅचसाठी दौऱ्यावर असेल तरीही तिची विचारपूस करत असतो. तिला हवं नको विचारत असतो. साक्षीच्या म्हणण्यानुसार, या बापलेकीचं नातं खूप वेगळं आहे. दोघांनाही एकमेकांशिवाय राहवत नाही.

माहीची मुलगी झिवाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक सुंदर फोटो शेअर केला गेला आहे. या फोटोत धोनीने झिवाला आपल्या मिठीत घेतलंय. झिवाच्या चेहऱ्यावरही जगातला सर्वोत्तम आनंद दिसतोय. हा हृदयीस्पर्शी फोटो इंटरनेटवर वेगात व्हायरल होतोय. ज्याच्यावर धोनीचे चाहते कमेंट करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.