मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण आणि हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा 2021 दादासाहेब फाळके आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मान केला जाणार आहे. कलाक्षेत्रात सुशांतला जो सन्मान आणि प्रेम हवां होतं, ते त्याला मृत्यू नंतर मिळत आहे.
सुशांतने वयाच्या 34 व्या वर्षी मुंबईतील (दि. 14 जून) आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत.
दादासाहेब फाळके अवॉर्ड या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन ही माहिती देण्यात आली आहे. मात्र हा सोहळा नेमका कोणत्या दिवशी होणार याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
दरम्यान, सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता CBI कडे सोपविण्यात आला आहे.