Aaditya Thackeray : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला आहे. बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात त्यांचे निधन झाले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीकडे जात असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या अकाली जाण्याने राजकीय वर्तुळातन तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना मांडल्या आहेत. अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत म्हंटले कि, अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे! शब्दच नाहीत. दादांसोबत गेले ५-६ वर्षं काम करण्याची संधी मिळाली… पहिलं सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात, असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटल आहे. अजित पवारांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना आवडायचा. मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं. आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे. अजित दादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजल, असं असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. Ajit Pawar death महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण दिवस” : देवेंद्र फडणवीस आज सकाळी अत्यंत दुःखद घटना घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अजित पवार यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये मोठी आस्था होती. अजित पवार हे संघर्ष करणारे नेते होते. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं व्यक्तिमत्व होतं. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी कठीण दिवस आहे. अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात.