-->

श्रीरामपूर कारागृहात कैद्यांची दादागिरी; एकाला बेदम मारहाण

नगर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर येथील दुय्यम कारागृहात जेवणावरून एका कैद्याला तिघा जणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (ता. 21) रात्री घडली. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तीन कैद्यांविरुद्ध खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय दादासाहेब गांगुर्डे, किरण जगन्नाथ चिकणे, सुधीर कडूबाळ सरकाळे अशी आरोपी असलेल्या कैद्यांची नावे आहेत. याप्रकरणी कैदी असलेल्या संदीप सुरेश कांबळे (वय 24) याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. ‘‘आमच्या आधी जेवण घेतो काय?’’ असे म्हणून वरील तिघा आरोपी कैद्यांनी संदीप कांबळे याला जेवणाच्या जर्मलच्या भांड्याने मारहाण केली.

तुझा काटाच काढतो, असे म्हणून शिवीगाळ केली त्यात डोक्याला जबर मार लागला,’’ आरडाओरड केल्याने पहारेकरी पोलिसांनी बराकीकडे धाव घेतली. त्यावेळी बराकीमध्ये अन्य कैदी प्रचंड घाबरलेले होते. पोलिसांनी बराक खोलून तत्काळ रुग्णालयात दाखल केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी भेट देऊन पाहाणी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.