Ajit Pawar : आज सकाळी प्रसारमाध्यांवर बातमी धडकली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. अजित पवार हे जखमी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पाच जणांचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले. काही वेळातच बातमी आली की अजित पवार यांचा देखील मृत्यू विमान झाला. या दुर्देवी घटनेनंतर महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्राच्या राजकरणातील दादा माणूस सगळ्यांना सोडून गेल्याने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. दादांच्या अकाली एक्सिट सर्वांच्याच मनाला चटका लावणारी ठरली. बारामतीसह महाराष्ट्र शोक सागरात बुडाला. सगळेच जण निःशब्द झाले आहेत. त्यांच्या निधानानंतर त्यांचा राजकीय प्रवासाबाबत सांगितले जात आहे. त्यांनी तब्बल ६ वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भूषविले. नुकत्याच राज्यात नगरपरिषदा आणि महापालिका निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत अजित पवार स्वतः मैदानात उतरले. पायला भिंगरी बांधून अजित दादा रणांगणात उतरले होते. त्यांच्या तोंडून एखादा शब्द बाहेर पडला की त्याची चर्चा झाली नाही असे कधी होणार नाही. अजित पवार यांनी राजकारणात दादा म्हणून नावलौकिक मिळवले. महत्वाचे म्हणजे अजित पवार हे पटलं नाही तर थेट बोलत असयाचे, असा त्यांचा स्थायी स्वभाव होता. त्यांच्या कामाचा सपाटा पहाटेपासूनच सुरू व्हायचा. हेही वाचा :Ajit Pawar : उपमुख्यमंत्री पदाचं रेकॉर्ड मोडलं पण ‘ते’ स्वप्न अधुरचं राहिलं…; भाषणादरम्यानही अजित पवारांनी व्यक्त केली होती इच्छा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या काळात अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचा बहिरनीला विवाह सोहळा पार पडला. इतका आनंदाचा क्षण असतानाही अजित पवारांनी निवडणुकीकडे डोळेझाक केली नाही. मुलाचे लग्न असूनही त्यांचा दौरा सुरूच होता. लग्न झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या कामाला सुरूवात केली. थोडक्यात जय पवार यांच्या लग्नाच्या वेळी अजित दादा बहिरनीला गेले. त्याअगोदर आणि त्यानंतर त्यांनी स्वतः ला कनेक्ट ठेवण्यात ठरवले होते आणि ते त्यांनी करून दाखवले. आपल्या मुलाचे लग्न आहे असा औरा कधीही अजित पवार यांनी भासून दिला नाही. या उलट त्यांनी प्रचारसभा गाजवली. अजित पवार आता हयात नाही. हे कडू सत्य महाराष्ट्रातील जनतेला स्विकारण्याशिवाय पर्याय नाही. असा नेता पुन्हा होणे नाही. दादा त्यांच्या आठवणींमुळे सदैव स्मरणात राहतील, अशीच भावना प्रत्येकाच्या मनी आहे. हेही वाचा : Ajit Pawar: “३ वर्ष तुमच्यासोबत पक्षासाठी काम केलं तेव्हा…” अजित पवारांच्या अकाली जाण्याने मराठी अभिनेत्रीची मन सुन्न करणारी पोस्ट