मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यांच्या लग्नाचे फोटो अजूनही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, नुकताच मानसीने सोशलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून तिने त्या दोघांचा म्युझिक अल्बम भेटीला येत असल्याचे सांगितले आहे. “लग्न होऊनी महिना झाला ऋतू बहरला, वाटेवर मोगरा उमलला अन दरवळला, मनी मानसी डोळ्यांमध्ये भाव उतरले, प्रदीप झाले अवघे जगणे आणि उजळले..” या आशयाचे कॅप्शन मानसीने दिले आहे.
View this post on Instagram
सध्या मानसीच्या या व्हिडिओवर फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो.
View this post on Instagram