दादांचे “इच्छुकां’च्या पतीदेवांना खडेबोल

जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून भेटीगाठी सुरू झाल्याने सूचक सूचना

पुणे- जिल्हा परिषद अध्यक्षपदावर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुक महिलांच्या पतीदेवांसह नेत्यांना भेटण्यासाठी पुणे, मुंबईवारी सुरू झाली आहे, असे खडेबोल माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार सुनावल्याने इच्छुकांची चलबिचल झाली आहे. दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड नवीन वर्षात करण्यात येईल, असेही जाहीर केल्याने इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पक्ष मेळावा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची शनिवारी (दि. 21) होणारी निवड जानेवारी महिन्यात होणार आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे शनिवारी (दि. 14) कोणत्याही इच्छुकांच्या मुलाखती घेणार नसून, रविवारी (दि. 22) पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुलाखतीची वेळ ठरविली जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले की, अध्यक्ष, उपाध्यक्षासह विषय समिती सभापतिपदासाठी अनेक इच्छुक मला भेटायला मुंबईत आले, “काही एकटे आले, तर “काही पतीदेवांना घेऊन आले’. पुण्यातही इच्छुक भेटले. एका इच्छुकाने तर “मी विषय समिती सभापती म्हणून काम करत असताना एवढे चांगले काम केले की, “तुम्हाला माझ्याशिवाय दुसरा अध्यक्षच मिळू शकत नाही.’ असे म्हणताच सभागृहात हसा पिकला. यावेळी त्या विषय समितीच्या सभापती महिला कोण याबाबत चर्चा सुरू झाली. मेळावा संपल्यानंतर त्या सभापतींना भेटून “आपणच का?’ असे विचारू लागले.

  • नवीन अध्यक्षांना मिळणार दोन वर्षे
    विधानसभा निवडणुकीमुळे सध्याच्या अध्यक्षांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. आता शुक्रवीारी (दि. 20) मुदत संपत आहे, मात्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन असल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पुढील सूचना येईपर्यंत करू नये अशा सूचना ग्रामविकास विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना आले. त्यामुळे पुन्हा 20 दिवसांची मुदतवाढ अध्यक्षांना मिळाली. त्यामुळे नवीन अध्यक्षांना अडीच नाही तर दोन वर्षे मिळणार आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here