पुणे -पुणे विभागातील 6 लाख 34 हजार 577 रुग्ण करोनामुक्त झाले असून रुग्णांची संख्या 7 लाख 826 झाली आहे. तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 49 हजार 376 इतकी आहे.
पुणे जिल्ह्यातील एकूण 4 लाख 79 हजार 521 रुग्णांपैकी 4 लाख 27 हजार 400 रुग्ण बरे झाले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण 42 हजार 573 आहे. सातारा जिल्ह्यात करोना बाधित एकूण 62 हजार 584 रुग्णांपैकी 58 हजार 613 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 2 हजार 88 आहे.