मुंबई : डाॅ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विक्रम भावेचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. विक्रम भावे यांच्यावर डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणात रेकी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी होणार आहे.
2013 Dabholkar murder case: Pune Sessions Court has rejected the bail application of accused Vikram Bhave
— ANI (@ANI) January 21, 2020
विक्रम भावेच्या वकिलांनी जामीन अर्ज मंजूर करावा अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. दाभोलकर हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना २६ मे रोजी सीबीआयने अटक केली होती. विक्रम भावे यांच्यावर दाभोलकरांची ओळख पटून देणे, घटनास्थळाची रेकी करणे असे आरोप ठेवण्यात आले आहे.