Dabholkar Trust : वंचित समाज घटकांसाठी उल्लेखनीय काम करणार्या पुरोगामी व परिवर्तनवादी व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रा. कुंदा (अंबु) अच्युत दाभोलकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दाभोलकर कुटुंबीयांच्यावतीने ट्रस्टतर्फे पुढील एक वर्षात विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व संस्थांना सुमारे दोन कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. ही मदत देण्यासाठी इच्छुकांकडून माहिती मागविण्यात आली आहे. मदत देताना वंचित समाज, महिला आणि मुलींच्या क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती आणि संस्थांना प्राधान्य देण्यात येणार असून, काही रक्कम शालेय मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी अभिनव उपक्रम राबविणार्यांना आणि रचनात्मक कामाला मदत दिली जाणार आहे. इच्छुकांनी आपली माहिती पाचशे शब्दांच्या आत पाठवायची असून, पाचशे शब्दांपेक्षा अधिक माहिती विचारात घेतली जाणार नाही, तसेच इतर कोणतीही पत्रके नसावीत, इच्छुक संस्थांकडे कर सवलत असलेल्या पत्राची (८० जी) गरज नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आलेल्या माहितीची छाननी निवड समितीमार्फत करुन निवड केली जाणार आहे. Satara : महसूल थकविणाऱ्या गाळेधारकांवर कारवाईच प्रतीक्षा; सातारा पालिकेचे दुर्लक्ष तसेच निवड झालेल्या व्यक्ती व संस्थांना सहयोगाच्या रकमेची मदत देण्यात येईल. निवड समिती प्रस्तावांचा अभ्यास करेल. निवडलेल्या व्यक्तींना व संस्थांना तसे सहयोगाच्या रकमेसह कळविले जाईल आणि ती माहिती वेळोवेळी साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध होईल. याबाबत इतर कोणताही पत्रव्यवहार इतर कोणाशीही केला जाणार नाही, सेही नमूद केले आहे. इच्छुकांनी दत्तप्रसाद दाभोळकर (‘या’ बंगला, हॉटेल ग्रीनफिल्ड लेन, सदरबझार, सातारा) या पत्त्यावर किंवा dabholkard155@gmail.com या ई मेल वर आपले प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत या उपक्रमातून साहाय्य जाहीर झाली आहे. त्यामध्ये विजय दिवाण (एक लाख रुपये), दत्ता देसाई (एक लाख रुपये), निरंजन टकले (एक लाख रुपये), संध्या चौगुले (हिरवाई, दोन लाख रुपये), विनिमय ट्रस्ट (कोपरखैरणे, नवी मुंबई, पाच लाख रुपये) आणि वन निकेतन (मु. सोनरपाडा, पो. ता. मुरबाड, जि. ठाणे, पाच लाख रुपये) यांचा समावेश आहे. Pune District : देवदत्त निकम यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी