पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांच्या सीबीआय कोठडीत 4 जून पर्यत वाढ करण्यात आली आहे. असा निकाल न्यायाधीश ए व्ही रोट्टे यांनी शनिवारी दिला. यापूर्वी या दोघांना 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहायक विक्रम भावे या दोघांना मुंबईतून अटक केली. त्यानंतर सीबीआयचे अधिकारी दोघांना पुण्यात घेऊन आले होते. रविवारी (26 मे) या दोघांना कोर्टात हजर करण्यात आलं होत. संजीव पुनाळेकर हे या हत्याकांडातील आरोपींचेही वकील आहेत.