पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेले संशियित आरोपी विक्रम भावे याच्या जामिनावर 21 जानेवारी रोजी निकाल होणार आहे.
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. जामिनावर सरकारी आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. भावे याच्या जामिनावर गुरुवारी (दि. 16) निकाल होणार होता. मात्र न्यायाधीशांना निकालासाठी पुढील तारीख दिली आहे.