मुंबई –‘हुड हुड दबंग दबंग’ या गाण्यात काही ऋषी सलमानसोबत आक्षेपार्हपद्धतीने डान्स करताना दिसतात. हे सगळे हिंदूंच्या भावना दुखावणारे असल्याचे सुनील घंवात यांनी म्हटले आहे. ऋषीमुनींच्या जागी मौलवी आणि फादर-बिशप यांना नाचताना दाखवण्याची हिंमत मेकर्स करतील का? असा सवाल केला गेला.
दरम्यान, ‘हुड हुड दबंग दबंग’ या गाण्यात काही ऋषी सलमानसोबत आक्षेपार्हपद्धतीने डान्स करताना दिसतात. हे सगळे हिंदूंच्या भावना दुखावणारे असल्याचे सुनील घंवात यांनी म्हटले आहे. ऋषीमुनींच्या जागी मौलवी आणि फादर-बिशप यांना नाचताना दाखवण्याची हिंमत मेकर्स करतील का? असा सवाल केला गेला.
हे टायटल सॉन्ग हिंदूच्या भावना दुखावणारे असल्याचा हिंदू जनजागृती समितीचा आरोप आहे. या समितीचे महाराष्ट्र व झारखंडचे आयोजक सुनील घंवात यांनी या गाण्यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता.परंतु ही आक्षेपार्ह दृश्य आता गाण्यातून काढून टाकण्यात आली आहेत.
दरम्यान, चित्रपटात कन्नड अभिनेता सुदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दबंग 3 मध्ये सलमान खान आणि सुदीप यांचे जोरदार ऍक्शन सीन प्रेक्षकांना दिसणार आहेत. आज 20 डिसेंबरला दबंग 3 चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे.