#dabangg 3 : ‘मुन्ना बदनाम’ सॉन्ग आऊट

मुंबई – ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी, ‘दबंग 3’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला. तसेच  चित्रपटाचे ‘हुड हुड दबंग दबंग’ हे टायटल सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला आले. यातच आता या चित्रपटातील सर्वाधिक चर्चित आइटम सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

दरम्यान, या आइटम सॉन्गचे नाव ‘मुन्ना बदनाम’ आहे. हे सॉन्ग सोशल मीडिया तसेच यू-ट्यूबवर रिलीज होताच ट्रेंडिग लिस्टमध्ये आले आहे. सध्या या गाण्याला सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहे.  या गाण्यात सलमानचा डान्स स्टेप चर्चेची चर्चा होत आहे.

‘दबंग 3’ चित्रपटात कन्नड अभिनेता सुदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दबंग 3 मध्ये सलमान खान आणि सुदीप यांचे जोरदार ऍक्‍शन सीन प्रेक्षकांना दिसणार आहेत. येत्या 20 डिसेंबरला दबंग 3 चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.