‘दबंग ३’ चित्रपट अडचणीत; सलमानला पुरातत्व विभागाने बजावली नोटीस 

‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग घेऊन येत आहे. बॉलीवूडमधील चुलबूल पांडे अर्थात सलमान खानच्या बहुचर्चित ‘दबंग-3′ चित्रपटाच्या शूटिंगला प्रारंभ झाला आहे. परंतु, शूटिंग सुरु होऊन काही दिवशी झाले नसून चित्रपट अडचणीत सापडला आहे. सलमान खानला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (ASI) नोटीस बजावण्यात आली आहे.

एएसआयने सलमान आणि त्याच्या टीमला मध्यप्रदेशच्या मांडू येथील ऐतिहासिक जल महालात उभारण्यात आलेले दोन सेट हटवण्याचे आदेश दिले आहेत. नोटीसमध्ये ही अटही घालण्यात आली की निर्मात्यांनी जर एएसआयचा आदेश मान्य केला नाही तर सिनेमाचं चित्रीकरण रद्दही करण्यात येईल. एवढेच नव्हे तर नर्मदा नदीजवळच्या किल्ल्यातील प्राचीन मुर्तीचे नुकसान केल्याचा आरोपही ‘दबंग ३’ च्या टीम लावण्यात आला आहे.

दरम्यान, चित्रपटाची निर्मिती अरबाज खान करत असून दिग्दर्शन प्रभुदेवा करत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.